चालण्याच्या शर्यतीत आकाशदीप, सूरज यांना ऑलिम्पिकचे तिकीट

चंदिगड येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या २० किलोमीटर राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत आकाशदीपने १ तास, १९.३८ मिनिटांसह अग्रस्थान मिळवले.
चालण्याच्या शर्यतीत आकाशदीप, सूरज यांना ऑलिम्पिकचे तिकीट

चंदिगड : भारताच्या आकाशदीप सिंगने मंगळवारी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवतानाच पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली. तसेच सूरज पनवारही या स्पर्धेसाठी पात्र ठरला.

चंदिगड येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या २० किलोमीटर राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत आकाशदीपने १ तास, १९.३८ मिनिटांसह अग्रस्थान मिळवले. २०२३मध्ये रांची स्पर्धेतही त्याने विजेतेपद मिळवले होते. आकाशदीपने स्वत:चाच १ तास, १९.५५ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. दुसरीकडे सूरजने १ तास, २०.१० मिनिटे अशी वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवतानाच ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. भारताचे आतापर्यंत चार जण चालण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये आकाशदीप, सूरजसह परमजीत बिश्त, विकास सिंग यांचा समावेश आहे. परमजीत व विकास यांनी गेल्या वर्षी जपान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेद्वारेच ऑलिम्पिक प्रवेश पक्का केला होता. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे.

एखाद्या देशाचे तीनच धावपटू ऑलिम्पिकमध्ये चालण्याच्या शर्यतीत भाग घेऊ शकतात. त्यामुळे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाला चौघांपैकी सर्वोत्तम ३ जणांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे चौघांपैकी एकाचे स्वप्न उद्ध्वस्त होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in