
एकदिवसीय क्रिकेट कालांतराने बंद होण्याची शक्यता आहे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने व्यक्त केले. एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान ३७ वर्षीय उथप्पाने याविषयी भाष्य केले.
“ट्वेन्टी-२० आणि कसोटी प्रकार चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. परंतु एकदिवसीय प्रकारात ठराविक वेळेनंतर कंटाळा येऊ लागतो. एकदिवसीय सामने खेळण्याची विशिष्ट शैली निर्माण झाली असून यामुळे काही खेळाडूही कालांतराने एकदिवसीय प्रकाराकडे दुर्लक्ष करतील,” असे उथप्पा म्हणाला. त्याशिवाय विराट कोहली विश्वचषकात भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करेल, असे उथप्पाने सांगितले. तसेच रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराकडे कसोटीचे, तर ऋषभ पंतकडे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात यावे, असे उथप्पाने सुचवले.