डेरवण येथे फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

सकाळी ११ ते सायंकाळी ७पर्यंत एकूण आठ फेऱ्यांमध्ये स्विस साखळी पद्धतीने ती खेळवली जाणार आहे.
डेरवण येथे फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्ह्याला यंदाच्या ११ वर्षाखालील राज्य निवड फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे सदर स्पर्धेचे आयोजन डेरवण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच क्लासिकल प्रकारातील फिडे मानांकन स्पर्धा असून ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७पर्यंत एकूण आठ फेऱ्यांमध्ये स्विस साखळी पद्धतीने ती खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेला डेरवणच्या विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे मोलाचे सहकार्य लाभले असून स्पर्धेसाठी लागणार प्रशस्त हॉल, तसेच. प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या दोन मुले व दोन मुली अश्या एकूण चार खेळाडूंची निवासाची मोफत व्यवस्था एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स अकॅडमी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडून करण्यात येणार असून स्पर्धेत खुला गट आणि मुलींचा गट मिळून एकूण २०० खेळाडूंचा सहभाग अपेक्षित असल्याचे विवेक सोहनी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in