३४ व्या वसई तालुका कला- क्रीडा महोत्सवाचे आयोजन ;जनरल चॅम्पियनशिपवर विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टने कोरले नाव

रविवारी सायंकाळी वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर यंदाच्या यंदाच्या ३४ व्या कला -क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ आणि समारोप झाला.
३४ व्या वसई तालुका कला- क्रीडा महोत्सवाचे आयोजन ;जनरल चॅम्पियनशिपवर विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टने कोरले नाव

वसई : सुमारे ५५ हजार स्पर्धकांच्या सहभागाने गेले आठवडाभर सुरू असलेल्या वसईतील कला-क्रीडा महोत्सवाचे रविवारी सूप वाजले. यावेळी हजारो वसईकरांनी मैदानावर हजेरी लावून परस्परांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी रात्रीच्या १२ वाजेला आकाशात फटाक्यांची नयनमनोहर आतषबाजी करण्यात आली. यंदाच्या महोत्सवाच्या जनरल चॅम्पियनशिपवर विरार येथील विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टने सर्वाधिक बक्षिसे जिंकत आपले नाव कोरले आहे. तसेच महोत्सवाची क्रीडा विभागातील ट्रॉफी सुद्धा विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टने जिंकली असून, कला विभागातील जनरल चॅनम्पियनशिप विरारच्या एकसपर्ट इंटरनॅशनल विद्यालयाने जिंकली आहे. एकंदर महोत्सवातील सर्वोत्कृष्ट स्पर्धाकाला दिल्या जाणारी 'गोल्डन गर्ल' ट्रॉफी विवाच्या सृष्टी घरत या विद्यार्थिनीने सर्वाधिक बक्षिसे जिंकून पटकाविली आहे.

रविवारी सायंकाळी वसईच्या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर यंदाच्या यंदाच्या ३४ व्या कला -क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ आणि समारोप झाला. यावेळी महोत्सवाचे प्रणेते आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी महापौर राजीव पाटील व प्रवीण शेट्टी, वसई विकास बँकेचे अध्यक्ष आषय राऊत, शिवसेना नेते विनायक निकम व शिरीष चव्हाण, माजी प्राचार्य माणिक दोतोंडे, माजी नगराध्यक्ष अजय खोखाणी, वसई विकास बँकेचे माजी उपाध्यक्ष जगदीश राऊत, डॉ. विजय शिरीषकर, निवृत्त कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आदी मान्यवर मंच्यावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायास नववर्षाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करतानाच, पराभूत झालेल्यांना पुढील वर्षी अधिक चांगली तयारी करून, महोत्सवात पुन्हा एकदा जिद्दीने उतरण्याचे आवाहन करून विद्यार्थी व तरुणांनी आपआपली शरीर संपदा सुदृढ ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करण्याचे आवाहन आमदार क्षितिज ठाकूर यांनी यावेळी केले.

कला-क्रीडा महोत्सव कायम सुरूच राहणार

वसई-विरारच्या विद्यार्थी आणि युवकांच्या कला-क्रीडा गुणांना वाव देण्याबरोबरच या क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध करून देणारा हा कला-क्रीडा महोत्सव यापुढेही वाढत्या प्रतिसादाने कायम सुरूच राहणार असून, संयोजनामध्ये नवीन कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी महापौर राजीव पाटील यांनी यावेळी केले

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in