पाकिस्तान अवघ्या ९१ धावांत गारद; पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून धुव्वा

न्यूझीलंडने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १८.४ षटकांत ९१ धावांत गारद झाला होता.
पाकिस्तान अवघ्या ९१ धावांत गारद; पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून धुव्वा
एक्स (@ICC)
Published on

ख्राईस्टचर्च : कायले जेमिसन (८ धावांत ३ बळी) आणि जेकब डफी (१४ धावांत ४ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने रविवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी आणि ५९ चेंडू राखून धुव्वा उडवला.

पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आला असून या विजयासह न्यूझीलंडने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १८.४ षटकांत ९१ धावांत गारद झाला होता. खुश्दील शाहने त्यांच्याकडून सर्वाधिक ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात टिम सेईफर्ट (२९ चेंडूंत ४४ धावा), फिन एलन (नाबाद २९) आणि टीम रॉबिन्सन (नाबाद १८) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने १०.१ षटकांतच विजय मिळवला.

मंगळवारी उभय संघांतील दुसरा सामना होईल. बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या अनुपस्थितीत पाकिस्तान संघ न्यूझीलंड दौऱ्यावर टी-२० मालिकेसाठी आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in