पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता; शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळण्याबाबत साशंकता कायम

शाहीन आफ्रिदीला श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता; शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळण्याबाबत साशंकता कायम

यूएईमध्ये २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळण्याबाबत साशंकता कायम आहे.

शाहीन आफ्रिदीला श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसरा कसोटी सामना खेळू शकला नव्हता; परंतु तरीही त्याचा आशिया चषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहीन आफ्रिदीच्या प्रकृतीबाबत सांगितले की, शाहीन आफ्रिदीला नेदरलँड्सला नेले जाईल. तेथे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवता येईल. तंदुरुस्त असल्यास नेदरलँड दौऱ्यावरही तो खेळू शकतो.

आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणार आहे. आशिया चषकापूर्वी शाहीन आफ्रिदी तंदुरुस्त व्हावे, असे पाकिस्तानच्या संघाला आवडेल, कारण पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे आणि शाहीन आफ्रिदीची भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.

२०२१च्या टी-२० विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने के एल राहुल आणि विराट कोहली यांना बाद करून चमकदार कामगिरी केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in