नेदरलँडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर;. हसन अलीऐवजी नसीम शाहची संघात निवड

दुखापतग्रस्त असूनही वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी संघात निवड करण्यात आली आहे
नेदरलँडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर;. हसन अलीऐवजी नसीम शाहची संघात निवड

संयुक्त अरब अमिरातमध्ये येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी आणि नेदरलँडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला असून वेगवान गोलंदाज हसन अलीला डच्चू देण्यात आला आहे. हसन अलीऐवजी नसीम शाहची संघात निवड करण्यात आली आहे. नेदरलँडविरुद्ध १६ ते २१ ऑगस्टदरम्यान वन-डे मालिका नियोजित आहे. त्यानंतर २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धा होणार आहे.

दुखापतग्रस्त असूनही वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी संघात निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे आफ्रिदी श्रीलंका दौऱ्यात दुसऱ्या कसोटीतून बाहेर आहे. पाकिस्तानच्या निवड समितीने आफ्रिदीची निवड दोन्ही संघात केली आहे. आफ्रिदी हा ट्रेनर आणि फिजियोच्या देखरेखीखाली आहे. पाकिस्तानी निवडकर्त्यांनी फलंदाज शान मसूदला संघात स्थान दिलेले नाही. मसूदने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती.

निवड समितीचे प्रमुख मोहम्मद वसीम यांनी सांगितले की, “आम्ही आवश्यक ते बदल केले आहेत. आमच्यासाठी आशिया कप महत्त्वाचा आहे. यासाठी आम्ही कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांशी सल्लामसलत केल्यानंतर सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे.”

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूचे ट्रेनिंग शिबीर ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यात दोन ५० षट्कांचे सामने खेळविले जातील.

हसन अलीने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानसाठी निराशाजनक कामगिरी केली होती. हसन अलीमुळे पाकिस्तान संघाला टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in