टीम इंडियाच्या स्वागतासाठी पाकिस्तानी चाहते उत्सुक

वेस्ट इंडीज, पाकिस्तान यांच्यातील मािलकेत पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये टीम इंडियाची क्रेझ दिसून आली
टीम इंडियाच्या स्वागतासाठी पाकिस्तानी चाहते उत्सुक

वेस्ट इंडीज, पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 'टीम इंडिया'साठी प्रेक्षकांनी पोस्टरबाजी केल्याने दिसून आले. ‘आम्ही भारताचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत,’ असा मजकूर लिहिलेले फलक चाहत्यांनी फडकविले. संपूर्ण मालिकेत टीम इंडियाच्या आगमनासाठी पाकिस्तानी चाहत्यांनी फलक फडकविल्याचे सांगण्यात येते.

वेस्ट इंडीज, पाकिस्तान यांच्यातील मािलकेत पाकिस्तानी प्रेक्षकांमध्ये टीम इंडियाची क्रेझ दिसून आली. भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी आणि आशिया कपमध्येच आमनेसामने येतात. दहशतवादाच्या कारणामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट शौकिनांना उभयपक्षी मालिका पूर्ववत होण्याची प्रतीक्षा आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका सध्या होत नसल्याने पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांना भारताने पाकिस्तानचा दौरा करावा, असे वाटत आहे. वेळोवेळी पाकिस्तानच्या प्रेक्षक गॅलरीतून टीम इंडियातील खेळाडूंविषयी प्रेम व्यक्त करणारे फलक झळकत असतात, असे सांगण्यात येते. असाच फलक पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान झळकला.

तिसऱ्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानचा गोलंदाज शहनवाज दहानीने वेस्ट इंडीजच्या फलंदाजाला बाद करताच कॅमेरामनने कॅमेरा प्रेक्षक गॅलरीकडे वळवला. यावेळी एक चाहत्याने हातात घेतलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधले. या पोस्टरवर ‘आम्ही इथे भारताचे स्वागत करू इच्छितो ’असे इंग्रजीत लिहिले होते.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनेक वेळा भारतासमोर द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे; मात्र भारताने याला कोणताही प्रतिसाद अजूनपर्यंत दिलेला नाही

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in