पाकिस्तानचा पहिला विजय; नेदरलँड्सवर सहा गडी राखून मात

विजयासाठीचे ९२ धावांचे पाकिस्तानने १३.५ षटकांत ४ बाद ९५ धावा करीत साध्य केले.
पाकिस्तानचा पहिला विजय; नेदरलँड्सवर सहा गडी राखून मात
Published on

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत रविवारी दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर सहा गडी राखून मात करीत अखेर पहिलावहिला विजय मिळविला. यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशाही पल्लवित झाल्या. २२ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट‌्स घेणाऱ्या शादाब खानला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

विजयासाठीचे ९२ धावांचे पाकिस्तानने १३.५ षटकांत ४ बाद ९५ धावा करीत साध्य केले. मोहम्मद रिझवानने ३९ चेंडूंत सर्वाधिक ४९ धावा करताना पाच चौकार लगावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँड्सला पर्थच्या उसळत्या आणि वेगवान खेळपट्टीवर पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी निर्धारित २० षटकांत अवघ्या ९ बाद ९१ धावांवर रोखले. अवघ्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नेदरलँड्सला पहिला धक्का बसला. स्टीफन मायबर्ग (११ चेंडूंत ६) शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल मोहम्मद वासिमने टिपला. त्यानंतर विशिष्ट अंतराने नेदरलँड्सचे फलंदाज बाद झाले.

logo
marathi.freepressjournal.in