पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज 'या' कारणामुळे आशिया चषकातून बाहेर

गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली
पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज 'या' कारणामुळे आशिया चषकातून बाहेर

पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदी गुडघ्याला झालेल्या आशिया चषकातून बाहेर पडला. त्यामुळे आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा जवळ आलेली असतानाच पाकिस्ताच्या संघाला मोठा धक्का बसला. दरम्यान, शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तानी गोलंदाजी कमकुवत झाली आहे.

गाले येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. नव्याने केलेल्या स्कॅन आणि वैद्यकीय तपासणी अहवालांच्या आधारे त्याला चार ते सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नजीबुल्लाह सुमरो यांनी माहिती दिली की, “मी शाहीनशी बोललो. दुखापतीमुळे तो अस्वस्थ झाला आहे. पीसीबीचा क्रीडा आणि औषध विभाग येत्या काही आठवड्यांत त्याच्यावर जवळून लक्ष ठेवेल. मला खात्री आहे की, तो पुनरागमन करेल. तो ऑक्टोबरमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे.”

गेल्या वर्षी टी २० विश्वचषकात भारताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात शाहीनने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने आधी रोहित आणि के एल राहुल या दोघांना बाद केल्यानंतर विराट कोहलीलाही बाद केले होते. त्याच्यामुळेच पाकिस्तानने विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in