पंत की जुरेल; यष्टिरक्षक कोण? भारत-बांगलादेश कसोटी मालिका

भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्यामुळे २३ वर्षीय ध्रुव जुरेलला संघातील स्थान गमवावे लागणार, हे जवळपास पक्के आहे.
पंत की जुरेल; यष्टिरक्षक कोण? भारत-बांगलादेश कसोटी मालिका
Published on

भारताचा २६ वर्षीय डावखुरा फलंदाज ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र त्यामुळे २३ वर्षीय ध्रुव जुरेलला संघातील स्थान गमवावे लागणार, हे जवळपास पक्के आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पंत आणि जुरेलपैकी कोणाला यष्टिरक्षक म्हणून प्राधान्य देण्यात यावे, याविषयी चर्चा रंगत आहे.

डिसेंबर २०२२मध्ये झालेल्या अपघातानंतर पंतने यावर्षी एप्रिल महिन्यात आयपीएलद्वारे पुनरागमन केले. त्यानंतर जूनमध्ये भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचाही तो भाग होता. हळूहळू पंत भारताच्या एकदिवसीय संघातही परतला. नुकताच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळून पंतने कसोटी क्रिकेटसाठीही आपण तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले.

मात्र मार्चमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जुरेलने यष्टिरक्षणासह फलंदाजीतही छाप पाडली होती. आता पंतच्या परतण्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागण्याची शक्यता असल्याने काही चाहते नाराज आहेत. गेल्या दीड वर्षांत भारताने कसोटीमध्ये यष्टिरक्षणात के. एस. भरत, के. एल. राहुल असे पर्याय पडताळून पाहिले. मात्र भरतने निराशा केली, तर राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला. आता तो फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. त्यामुळे यष्टिरक्षणासाठी एकहाती सामना फिरवू शकणाऱ्या पंतलाच प्राधान्य मिळेल.

logo
marathi.freepressjournal.in