Paralympic Games Paris 2024: पॅरिस पॅरालिम्पिकला आजपासून सुरुवात

आयुष्याशी लढा देत अनेक कठीण आव्हानांवर मात करणारा भारताचा पॅरा-ॲॅथलीट्सचा ८४ जणांचा संघ आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे
Paralympic Games Paris 2024: पॅरिस पॅरालिम्पिकला आजपासून सुरुवात
X/@PCI_IN_Official
Published on

पॅरिस : आयुष्याशी लढा देत अनेक कठीण आव्हानांवर मात करणारा भारताचा पॅरा-ॲॅथलीट्सचा ८४ जणांचा संघ आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताचा हा सर्वोत्तम संघ असून त्यात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. त्यामुळे पदकांची लयलूट करण्यासाठी भारताचे दिव्यांग खेळाडू सज्ज झाले आहेत.

भारताने गेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ५ सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके मिळवली होती. त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या आशियाई पॅरागेम्समध्ये भारताने २९ सुवर्णपदकांसह १११ पदके जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून अधिक पदकांची अपेक्षा आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे अनेक खेळाडू यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. त्यात भालाफेकपटू सुमित अंतिल, रायफल नेमबाज अवनी लेखरा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पॅरातिरंदाज शीतल देवी, होकाटो सेमा (गोळाफेकपटू) आणि नारायण कोंगानापल्ले (रोईंगपटू) यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. नेमबाज मनीष नरवाल आणि बॅडमिंटनपटू कृष्णा नागर यांच्या कामगिरीकडेही देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in