पॅरिस : भारताच्या प्रीती पालने ॲथलेटिक्समधील महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. २३ वर्षीय प्रीतीने महिलांच्या टी-३५ प्रकारात ही कामगिरी नोंदवली. मुख्य म्हणजे तिचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.
प्रीतीने काही दिवसांपूर्वीच १०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. सोमवारी तिने ३०.०१ सेकंदांत २०० मीटर अंतर गाठून तिसरा क्रमांक मिळवला. पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची दुसरी महिला खेळाडू ठरली. यापूर्वी नेमबाज अवनी लेखराने अशी कामगिरी नोंदवली होती.