Paris 2024 Olympics: भजनची आगेकूच; अंकिता गारद

तिरंदाजीच्या महिला एकेरी फेऱ्यांना मंगळवारी प्रारंभ झाला. यामध्ये राऊंड ऑफ ३२ म्हणजेच पहिल्या फेरीत भारताच्या भजन कौरने दमदार विजय नोंदवला, तर अंकिता भकतला गाशा गुंडाळावा लागला.
Paris 2024 Olympics: भजनची आगेकूच; अंकिता गारद
AFP
Published on

पॅरिस : तिरंदाजीच्या महिला एकेरी फेऱ्यांना मंगळवारी प्रारंभ झाला. यामध्ये राऊंड ऑफ ३२ म्हणजेच पहिल्या फेरीत भारताच्या भजन कौरने दमदार विजय नोंदवला, तर अंकिता भकतला गाशा गुंडाळावा लागला.

भजनने पोलंडच्या वायोलेटा मैसूरला ६-० असे नामोहरम केले. महिलांच्या सांघिक विभागात भारताला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी एकेरीत भजनने चांगली कामगिरी केली. त्यापूर्वी भजनने, राऊंड ऑफ ६४ फेरीत इंडोनेशियाच्या सैफिया नुराला ७-३ असे पराभूत केले होते. अंकिताला मात्र पोलंडच्या मैसूरकडून राऊंड ऑफ ६४मध्ये २-४ असा पराभव पत्करावा लागला. मग भारताच्या भजनने मैसूरला नमवून तिचे आव्हान संपुष्टात आणले. पुरुषांच्या एकेरी फेरीला बुधवारपासून प्रारंभ होईल.

logo
marathi.freepressjournal.in