पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी, मंगळवारी मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घालताना भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी दिली. हे भारताचे यंदाच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये प्रथमच एखाद्या जोडीने नेमबाजीत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. दरम्यान, आज ऑलिम्पिकमधील पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंचा पदकासाठी कोणताही सामना होणार नसला तरी काही महत्त्वाचे सामने होणार आहेत. बघूया भारताचे आजचे वेळापत्रक
> नेमबाजी
५० मीटर रायफल थ्री पात्रता फेरी
ऐश्वर्य सिंग आणि स्वप्निल कुसळे
(दुपारी १२.३० वा.)
ट्रॅप महिला एकेरी: दुसरी फेरी
श्रेयसी सिंग, राजेश्वरी कुमारी
(दुपारी १२.३० वा.)
> तिरंदाजी
महिला एकेरी पहिली फेरी
दीपिका कुमारी वि. रीना पर्नट
(दुपारी ४ वा.)
आगेकूच केल्यास राऊंड ऑफ ३२ फेरीतील लढत ४.३० वाजता
पुरुष एकेरी बाद फेरी
तरुणदीप राय वि. टॉम हॉल
(रात्री ९.१५ वा.)
आगेकूच केल्यास राऊंड ऑफ ३२ फेरीतील लढत १०.१५ वा.
> बॅडमिंटन
महिला एकेरी साखळी सामना
पी. व्ही. सिंधू वि. क्रिस्टिन कुबा
(दुपारी १२.५० वा.)
पुरुष एकेरी साखळी सामना
लक्ष्य सेन वि. जोनाथन क्रिस्ती
(दुपारी १.४० वा.)
एच. एस. प्रणॉय वि. डूक फॅट
(रात्री ११ वा.)
> टेबल टेनिस
महिला एकेरी (राऊंड ऑफ ३२)
श्रीजा अकुला वि. जियान शेंग
(दुपारी २.२० वा.)
> बॉक्सिंग
महिला बाद फेरी (७५ किलो)
लवलिना बोर्गोहैन वि. सुनिव्हा
(दुपारी ३.५० वा.)
पुरुष बाद फेरी (७१ किलो)
निशांत देव वि. जोस गॅब्रिएल
(मध्यरात्री १२.१५ वा.)
> अश्वारोहण
ड्रेसेज एकेरी दुसरा दिवस
अनुष अगरवाला
(दुपारी १.३० वा.)