Paris Olympics 2024: सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’! आज विक्टर ॲॅक्सेलसेनशी उपांत्य फेरीत भिडणार

Lakshya Sen: भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’ ठेवत त्यादृष्टीने आगेकूच केली आहे.
Paris Olympics 2024: सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’! आज विक्टर ॲॅक्सेलसेनशी उपांत्य फेरीत भिडणार
PTI
Published on

पॅरिस : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’ ठेवत त्यादृष्टीने आगेकूच केली आहे. आता रविवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याच्यासमोर विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता विक्टर ॲॅक्सेलसेन याचे आव्हान असणार आहे.

पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या लक्ष्य सेन याने उपांत्य फेरी गाठणारा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू असा मान मिळवला. त्याने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चोऊ टिएन चेन याचे आव्हान १९-२१, २१-१५, २१-१२ असे संपुष्टात आणले. आता प्रतिस्पर्ध्यांवर कायम कुरघोडी साधणारा ॲॅक्सेलसेन याच्या आव्हानाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. डेन्मार्कच्या ३० वर्षीय विक्टरने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण तसेच रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर २०१७ आणि २०२२ मध्ये जागतिक जगज्जेतेपदे जिंकली आहेत. त्याचबरोबर २०१६मध्ये थॉमस कपचे आणि बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरची अनेक जेतेपदे पटकावली आहेत.

Paris Olympics 2024: सुवर्णपदकाचे ‘लक्ष्य’! आज विक्टर ॲॅक्सेलसेनशी उपांत्य फेरीत भिडणार
India at Olympics, Day 9 Full Schedule: लक्ष्य सेनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा, बघा भारताचे ४ ऑगस्टचे वेळापत्रक

लक्ष्य सेन हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता खेळाडू असून तो ॲॅक्सेलसेनविरुद्ध सात वेळा हरला असून फक्त एकदाच (२०२२, जर्मन ओपन) त्याला त्याच्याविरुद्ध विजय मिळवता आला आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास, लक्ष्यला सुवर्णपदकाचे ध्येय गाठण्याची संधी मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in