ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटन अभियानाला आज सुरूवात; लक्ष्य, सात्विक-चिराग विजयारंभासाठी सज्ज

Paris Olympics 2024: २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य व २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधूकडून आता सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेत. त्याशिवाय जागतिक क्रमवारीत सात्विक-चिरागची जोडी दुसऱ्या स्थानी असल्याने त्यांच्याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटन अभियानाला आज सुरूवात; लक्ष्य, सात्विक-चिराग विजयारंभासाठी सज्ज
Published on

पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनच्या अभियानाला शनिवारपासून प्रारंभ होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-तनिषा क्रॅस्टो यांची जोडी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पुरुष एकेरीत ल-गटात लक्ष्यची केव्हिन कॉर्डनशी गाठ पडणार आहे. तर पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग या दुसऱ्या मानांकित जोडीसमोर लुकास-रोनर यांचे आव्हान असेल. त्याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी-तनिषा किम-काँग यांच्याविरुद्ध सलामीचा सामना खेळतील. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू उद्घाटन सोहळ्यात भारताची ध्वजवाहक असल्याने तिचे सामने एक दिवस उशिराने सुरू होणार आहेत.

२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य व २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सिंधूकडून आता सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेत. त्याशिवाय जागतिक क्रमवारीत सात्विक-चिरागची जोडी दुसऱ्या स्थानी असल्याने त्यांच्याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. लक्ष्यची कामगिरी काही काळापासून खालावली असली तरी तो प्रस्थापितांना धक्के देऊ शकतो. त्यामुळे बॅडमिंटनमधून भारताला किमान एक पदक तरी नक्कीच अपेक्षित आहे, असे म्हणू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in