Reetika Hooda : रितिका उपांत्यपूर्व फेरीत पराभूत; रिपिचेजद्वारे अंतिम फेरीत खेळण्याची संधी

भारतीय कुस्तीपटू रितिका हुडा हिचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ७६ किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभव झाला आहे.
Reetika Hooda
रितिका उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
Published on

पॅरिस : भारतीय कुस्तीपटू रितिका हुडा हिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ७६ किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

किर्गिझिस्तानच्या आयपेरी मेडेट कायझी हिच्याविरुद्धच्या लढतीत रितिकाने पॅसिव्हिटी गुणाद्वारे आपले खाते खोलले होते. कायझी हिने पहिल्या फेरीत आक्रमक खेळ न केल्यामुळे रितिकाला हा गुण मिळाला होता. मात्र दुसऱ्या फेरीत कायझी हिनेही तशाचप्रकारे एक गुण मिळवला. रितिकाने शेवटच्या क्षणी वरचढ होण्याचा प्रयत्न केला, पण अखेर ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. कुस्तीत शेवटचा गुण मिळवणारा विजयी ठरत असल्यामुळे कायझी हिला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली.

तत्पूर्वी, रितिका हिने उपउपांत्यपूर्व लढतीत आक्रमक सुरुवात करत हंगेरीच्या बर्नार्ड नॅगी हिला १२-२ अशा फरकाने पराभूत केले होते. रितिकाने सुरुवातीलाच दोन गुण मिळवल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक होत आणखी चार गुणांची कमाई केली. मात्र बर्नार्ड हिने रितिकाच्या मांड्यांवर हल्ला चढवत तिला उताणी पाडले, त्यामुळे तिला दोन गुण मिळवता आले. ६-२ अशा स्थितीतून रितिकाने बर्नार्ड हिचे पोट पकडत तिला पाठीवर आपटले. त्यामुळे तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर तिला विजयी घोषित करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in