कमिन्स दुखापतीमुळे मुकणार; स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज तसेच कर्णधार पॅट कमिन्स पाठदुखीमुळे प्रतिष्ठित ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.
कमिन्स दुखापतीमुळे मुकणार; स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
कमिन्स दुखापतीमुळे मुकणार; स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार Photo : X
Published on

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज तसेच कर्णधार पॅट कमिन्स पाठदुखीमुळे प्रतिष्ठित ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने या मालिकेसाठी मागेच संघ जाहीर केला. पर्थ येथे पहिली कसोटी रंगणार असून त्यानंतर ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दुसरी, १७ डिसेंबरपासून ॲडलेडला तिसरी, २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

कमिन्स पाठीच्या दुखापतीमुळे जुलै महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत जोश हेझलवूड, मिचेल स्टार्कवर गोलंदाजीची मदार असेल.

logo
marathi.freepressjournal.in