IND vs AUS : सलग दुसऱ्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया कर्णधार मायदेशी; हे आहे कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु असलेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताची २ - ० अशी आघाडी
IND vs AUS : सलग दुसऱ्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया कर्णधार मायदेशी; हे आहे कारण
Published on

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ४ कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. यातील पहिल्या २ सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. अशामध्ये ४ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २ - ० असा पिछाडीवर आहे. आगामी कसोटी सामना हा इंदोरमध्ये खेळाला जाणार असून त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हा मायदेशी परतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचा संघ २ - ० असा अडचणीत सापडलेला असताना ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्स अचानक मायदेशी परतला. त्याच्या काही कौटुंबिक कारणांमुळे तो मायदेशी परातल्याची माहिती देण्यात येत आहे. पॅट कमिन्स इंदोरमध्ये १ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार असल्याचेदेखील सांगितले जात आहे. मात्र, तो जर आला नाही तर तिसऱ्या कसोटीमध्ये स्टीव्ह स्मिथ हा कर्णधार म्हणून आपल्याला दिसू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in