PBKS vs RCB, IPL 2025 : फलंदाजीत सुधारणा करण्याचे बंगळुरूसमोर लक्ष्य; पंजाबविरुद्ध आज भिडणार

मोठ्या पराभवानंतर पुनरागमन करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फारच कमी वेळ मिळाला आहे. बंगळुरूचा संघ रविवारी पंजाबविरुद्ध भिडणार असून फलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य संघापुढे असेल.
PBKS vs RCB, IPL 2025 : फलंदाजीत सुधारणा करण्याचे बंगळुरूसमोर लक्ष्य; पंजाबविरुद्ध आज भिडणार
IPL/X
Published on

मुल्लनपूर : मोठ्या पराभवानंतर पुनरागमन करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फारच कमी वेळ मिळाला आहे. बंगळुरूचा संघ रविवारी पंजाबविरुद्ध भिडणार असून फलंदाजीत सुधारणा करण्याचे लक्ष्य संघापुढे असेल.

टिम डेविड वगळता आरसीबीच्या फलंदाजांनी गत सामन्यात निराश केले. शुक्रवारी झालेल्या पंजाबविरुद्धच्या लढतीत बंगळुरूचा संघ ९५ धावांवर कोसळला. हा सामना त्यांना ५ विकेटने गमवावा लागला.

पावसामुळे हा सामना १४ षटकांचा खेळविण्यात आला. फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार आणि लिअम लिव्हिंगस्टोन हे आघाडीचे फलंदाज घरच्या मैदानावरील सामन्यात धावा जमवण्यात अपयशी ठरले.

रविवारी होणाऱ्या सामन्यात सॉल्ट आणि कोहलीकडून आक्रमक सुरुवातीची आरसीबीला अपेक्षा आहे. तसेच मधल्या फळीची जबाबदारी पाटीदार, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या आणि डेव्हिड यांच्यावर असेल.

गोलंदाजीत जोश हॅझलवूड आणि भुवनेश्वर कुमार हे अनुभवी वेगवान गोलंदाज आघाडीला असतील. मात्र त्यांना यश दयाल, कृणाल आणि सुयश शर्मा यांच्याकडून अधिक पाठिंब्याची आवश्यकता असेल. एकूणच संघात समतोल असणे गरजेचे आहे.

प्रतिस्पर्धी संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पडिक्कल, जेकब बिथेल, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, कुणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सूयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड.

पंजाब किंग्ज: श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, आरोन हार्डी, अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, ग्लेन मॅक्सवेल, हर्नुर पन्नू, हरप्रीत ब्रार, जोश इंग्लिस, कुलदीप सेन, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, सूर्यांश शेडगे, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स २ हिंदी आणि जिओहॉटस्टार अॅप

logo
marathi.freepressjournal.in