परदेशी संघांसोबत आयपीएल खेळण्यासाठी योजना तयार करण्यात येणार-जय शाह

आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये सामील झाली आहे
 परदेशी संघांसोबत आयपीएल खेळण्यासाठी योजना तयार करण्यात येणार-जय शाह
Published on

आयपीएल संघांनी देशाबाहेर जाऊन परदेशी संघांसोबत मैत्रीपूर्ण सामने खेळावेत यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. परदेशी संघांशीही याबाबत चर्चा केली जात आहे, मात्र ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी त्या काळात एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही हे पाहावे लागेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सांगितले.

जय शाह म्हणाले की, मैत्रीपूर्ण सामन्यासाठी परदेशी बोर्डाशी बोलणे सुरू आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये सामील झाली आहे. आयपीएलची लोकप्रियता जगभरात वाढली आहे. कोरोनाच्या काळात पुन्हा क्रिकेटचे वातावरण प्रस्थापित करण्यात आयपीएलने महत्त्वाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये डिजिटल स्ट्रीमिंग पाहणाऱ्यांची संख्या ५६० दशलक्ष होती, मात्र २०२२ मध्ये केवळ पाच वर्षानंतर ही संख्या ६६५ दशलक्ष झाली आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, आयपीएल सुरू झाल्यानंतर अनेक खेळाडू आपापल्या संघात सामील झाले. त्याचबरोबर अनेक खेळाडू राष्ट्रीय संघातून खेळण्यासाठी आयपीएलपासून दुरावले.

logo
marathi.freepressjournal.in