आयपीएलमध्ये अथ्थक खेळता पण देशासाठी मात्र विश्रांती घेता -सुनील गावसकर

टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेण्यावरून गावसकर यांनी वरिष्ठ खेळाडूंची जबरदस्त खरडपट्टी काढली.
आयपीएलमध्ये अथ्थक खेळता पण देशासाठी मात्र विश्रांती घेता -सुनील गावसकर

आयपीएलमध्ये अथ्थक खेळता; पण देशासाठी मात्र विश्रांती घेता, अशा शब्दात माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वरिष्ठ खेळाडूंना फटकारले.

टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेण्यावरून गावसकर यांनी वरिष्ठ खेळाडूंची जबरदस्त खरडपट्टी काढली. ते म्हणाले की, “खेळाडू आयपीएलमध्ये न थकता खेळतात; मात्र देशासाठी खेळायच्या वेळी मात्र त्यांना विश्रांती हवी असते.”

इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-२० सामनेदेखील खेळण्यात येणार आहेत; मात्र या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यावर गावसकर यांनी आक्षेप घेतला.

ते म्हणाले की, “विश्रांती घेण्याचे मी समर्थन करत नाही. आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही. मग भारतासाठी खेळताना तुम्ही विश्रांती का मागता? भारतासाठी खेळावेच लागेल.” त्यांनी सांगितले की, टी-२० सामन्यात २० षट्के खेळावी लागतात. त्यामुळे शरीरावर त्याचा जास्त ताण पडत नाही. त्यामुळे बीसीसीआयने विश्रांती धोरणावर लक्ष द्यायला हवे.

दरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत खेळाडूंनी विश्रांती घेतल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही एकमेव मालिका असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in