36th National Games : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३६व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन

देशभरातील जवळपास 15,000 खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी 36 क्रीडा शाखांमध्ये सहभागी
36th National Games : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३६व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भव्य उद्घाटन समारंभात ३६व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेणाऱ्या देशभरातील खेळाडूंना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि इतर मान्यवर देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. गुजरात राज्यात प्रथमच राष्ट्रीय खेळ होत आहेत. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील जवळपास 15,000 खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी 36 क्रीडा शाखांमध्ये सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in