तांत्रिकी कारणामुळे हुकले पूनमचे पदक;तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले

क्लीन अॅण्ड जर्कमधील तीनही प्रयत्न अवैध ठरल्यामुळे पूनमचे पदक हुकले.
तांत्रिकी कारणामुळे हुकले पूनमचे पदक;तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी मंगळवारी पूनम यादवचे पदक तांत्रिक कारणामुळे हुकले. बझर वाजण्यापूर्वीच बारबेल खाली टाकल्याने तांत्रिकदृष्ट्या तिचा तिसरा लिफ्ट ग्राह्य धरण्यात आला नाही.

क्लीन अॅण्ड जर्क प्रयत्नात ११६ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नातदेखील ११६ किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न फसला. तांत्रिक कारणामुळे तिचा दुसरा लिफ्ट देखील अवैध ठरविण्यात आला. त्यानंतर तिने तिसरा लिफ्ट यशस्वीरीत्या उचलला; मात्र बारबेल बझर वाजण्यापूर्वीच खाली टाकल्याने तांत्रिकदृष्ट्या तिचा तिसरा लिफ्ट ग्राह्य धरण्यात आला नाही. क्लीन अॅण्ड जर्कमधील तीनही प्रयत्न अवैध ठरल्यामुळे पूनमचे पदक हुकले. पूनमने ७६ किलो स्नॅच इव्हेंटमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ९५; तर तिसऱ्या प्रयत्नात ९८ किलो वजन उचलले. स्नॅच प्रकारात कॅनडाच्या माया लेयलोरने १०० किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकाविले. पूनम दुसऱ्या स्थानावर राहिली. पूनमने २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण; तर २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in