सिंकेफील्ड बुद्धिबळ स्पर्धा : विजयासह प्रज्ञानंद आघाडीवर; गुकेशचा आणखी एक पराभव

सिंकेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारचा दिवस भारतासाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला. एकीकडे सातव्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने संघर्षपूर्ण विजयासह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले, तर जगज्जेत्या डी. गुकेशला पराभवाला सामोरे जावे लागले.
सिंकेफील्ड बुद्धिबळ स्पर्धा : विजयासह प्रज्ञानंद आघाडीवर; गुकेशचा आणखी एक पराभव
(Photo - X/@rpraggnachess)
Published on

सेंट लुईस : सिंकेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारचा दिवस भारतासाठी संमिश्र स्वरूपाचा ठरला. एकीकडे सातव्या फेरीत भारताच्या आर. प्रज्ञानंदने संघर्षपूर्ण विजयासह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले, तर जगज्जेत्या डी. गुकेशला पराभवाला सामोरे जावे लागले.

अमेरिका येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १० खेळाडूंचा समावेश असून विजेत्याला ३ लाख ७५ हजार अमेरिकन डॉलर इतके बक्षीस दिले जाणार आहे. ग्रँडमास्टर गुकेश व प्रज्ञानंद असे दोन भारतीय या स्पर्धेचा भाग आहेत. एकंदर नऊ फेऱ्या स्पर्धेत होणार असून अद्याप २ फेऱ्या शिल्लक आहेत. सातव्या फेरीनंतर प्रज्ञानंद व अमेरिकेचा फॅबियानो कारुआना ४.५ गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थानी आहेत.

२० वर्षीय प्रज्ञानंदने सातव्या फेरीत फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझावर मात केली. मात्र गुकेशला अमेरिकेच्या वेस्लेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे गुकेश ३ गुणांसह तूर्तास तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता उरलेल्या दोन फेऱ्यांमध्ये गुकेशला विजय अनिवार्य आहे. तसेच प्रज्ञानंद अग्रस्थान टिकवून जेतेपद मिळवणार की कारुआना बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in