चेन्नई : आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता भारताचा स्टार टेनिसपटू प्रज्नेश गुणेश्वरनने शुक्रवारी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट करत गुणेश्वरनने टेनिसमधील निवृत्तीची घोषणा केली.
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रज्नेश म्हणाला की, माझे रॅकेट आता हँगअप करत आहे. आज मी स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारत आहे. तीन दशकांहून अधिक काळ हा खेळ माझा सर्वात मोठा शिक्षक आणि माझा सर्वात विश्वासू साथीदार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंत या खेळातील माझा प्रवास असाधारण राहिला आहे.
गुनेश्वरनने टॉप-२० खेळाडूविरुद्धचा सर्वात मोठा विजय २०१९ मध्ये मिळवला. त्याने इंडियन वेल्स मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या निकोलोज बॅसिलॅश्विलीचा पराभव केला होता.