प्रणव खातू ठरला कनिष्ठ मुंबई श्री; दिव्यांगांच्या गटात नितेश भंडारी, महबूब शेख अव्वल; मेन्स फिजिकमध्ये प्रतीक साळवी, आनंद यादवची बाजी

स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत झाला.
प्रणव खातू ठरला कनिष्ठ मुंबई श्री; दिव्यांगांच्या गटात नितेश भंडारी, महबूब शेख अव्वल; मेन्स फिजिकमध्ये प्रतीक साळवी, आनंद यादवची बाजी

मुंबई : मुंबईतील शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या ‘कनिष्ठ मुंबई श्री’ स्पर्धेत यंग दत्ताराम व्यायामशाळेचा प्रणव खातू विजेता ठरला. दिव्यांगांच्या मुंबई श्री स्पर्धेत नितेश भंडारी आणि महबूब शेख अव्वल आले. कनिष्ठ मेन्स फिजीक प्रकारात प्रतिक साळवी आणि आनंद यादव यांनी बाजी मारली. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत सतीश पुजारी (७० किलो), जगदीश कावणकर (७० किलोवरील) आणि शशिकांत जगदाळे ( ५० वर्षावरील) यांनी यश संपादन केले.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेतर्फे आयोजित ही स्पर्धा शाम सत्संग भवन, कांदिवली पश्चिम येथे पार पडली. तब्बल २५० पेक्षा अधिक पीळदार ग्लॅमरच्या उपस्थितीत रंगलेल्या संघर्षमय स्पर्धेत स्फूर्तिदायक खेळाचा मनमुराद आनंद क्रीडाप्रेमींना अनुभवता आला, दोन लाखांची बक्षीसे असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली. ज्युनियर मुंबई श्रीच नव्हे, तर फिजीक प्रकारात खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विस्फारणारा होता. तसेच दिव्यांग मुंबई श्री आणि मास्टर्स मुंबई श्रीलाही मोठ्या संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्वच गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत झाला.

विविध गटांचा निकाल पुढीलप्रमाणे

कनिष्ठ मुंबई श्री : ५५ किलो वजनी गट : ऋषिराज दुबे, ६० किलो : प्रतीक साळवी, ६५ किलो : वेदांत शेलार, ७० किलो : सूरज यादव, ७५ किलो : अंबाजी बोडेकर, ७५ किलोहून अधिक : प्रणव खातू; अंतिम विजेता : प्र‌णव खातू

दिव्यांग मुंबई श्री : ५५ किलो : नितेश भंडारी, ५५ किलोहून अधिक : महबूब शेख

कनिष्ठ मेन्स फिजिक : १६५ सेमीपर्यंत : प्रतीक साळवी, १६५ सेमीवरील : आनंद यादव

मास्टर्स मुंबई श्री : ४० ते ५० वर्षे - सतीश पुजारी, जगदीश कावणकर; ५० ते ६० वर्षे - शशिकांत जगदाळे, रघुनंदन पाटील

logo
marathi.freepressjournal.in