मलेशिया ओपन बॅडमिंटनमध्ये प्रणॉयची आगेकूच,प्रणीत आणि समीर झाले पराभूत

मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या महिला जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
मलेशिया ओपन बॅडमिंटनमध्ये प्रणॉयची आगेकूच,प्रणीत आणि  समीर झाले पराभूत

भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस‌्. प्रणॉयने मलेशिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये आगेकूच केली. बी. साई प्रणीत आणि समीर वर्मा यांना मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या महिला जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

प्रणॉयने मलेशियाच्या के डेरेन ल्यू याला २१-१४, १७-२१, २१-१८ असे पराभूत करत आगेकूच केली. प्रणीतला जागतिक क्रमवारीतील सहा क्रमांकाचा खेळाडू इंडोनेशियाचा ॲन्थोनी सिनिसुका गिनटिंगने नमविले, तर समीरला इंडोनेशियाच्याच जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमांकाचा खेळाडू जोनाथन क्रिस्टीने पराभूत केले. जागतिक क्रमवारीतील एकोणिसाव्या क्रमांकाचा खेळाडू ३० वर्षीय प्रणीतला गिनटिंगकडून ५० मिनिटे चाललेल्या सामन्यात १५-२१, २१-१९, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या गिनटिंगने प्रणीतविवरुध्दचे चार सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे. दोघेही २०२० मध्ये आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये आमनेसामने आले होते. त्यावेळी दुखापतीमुळे प्रणीतने माघार घेतल्याने गिनटिंगचा विजय झाला होता. दुखापतीतून सावरलेल्या समीरला ४९ मिनिटे चाललेल्या सामन्यात क्रिस्टीकडून १४-२१, २१-१३, ७-२१ अशी हार पत्करावी लागली. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी या महिला जोडीला पहिल्याच फेरीत नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा या जपानच्या सहाव्या मानांकित जोडीकडून १५-२१, ११-२१ असा पराभव झाल्याने स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जागतिक क्रमवारीतील आठव्या क्रमाकांच्या जोडीचा मॅन वेई चोंग आणि केई वुन टी या मलेशियाच्या जोडीचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in