लखनौ जायंट्ससाठी प्रार्थना ; शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर दर्शक श्वास रोखून

संजीव गोयंका यांना प्रार्थना करताना पाहुन अनेकांनी हा यंदाच्या आयपीएलमधला सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले
लखनौ जायंट्ससाठी प्रार्थना ; शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर दर्शक श्वास रोखून

मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना हा यंदाच्या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा सामना मानला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाचा लखनौ सुपर जायंट्स संघाने पाच धावांनी पराभव केला. या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्स संघाने प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची शक्यता अजून बळकट केली आहे.

लखनौ संघाच्या या विजयाचे शि़ल्पकार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि वेगवान गोलंदाज मोहसीन खान हे होते. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने 48 चेंडूत चार चौकार आणि आठ षटकार ठोकत नाबाद 89 धावा केल्या. तर मोहसीन खानने शेवटच्या षटकात कॅमरुन ग्रीनला 11 धावा काढू दिल्या नाहीत. सुरुवातीला मुंबई संघाचा कर्णधार रोहीत शेट्टी खेळपट्टीवर आला, त्यावेळी त्याने इशान किशनच्या मदतीने सुरुवातीच्या 10 षटकात 90 धावांपर्यंत मजल मारली. त्यावेळी मुंबई संघाचा विजय निश्चित वाटत होता. मात्र, रवी बिष्णईने दोघांना बाद केल्यानंतर मुंबई संघाच्या हातातून सामना निसटल्यात जमा झाला.

या रोमांचक सामन्याचे शेवटचे षटक दोन्ही संघांसाठी तसेच त्यांच्या चाहत्यांसाठी खुप तणावपुर्ण असल्याचे दिसून आले. शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवर दर्शक श्वास रोखून होते. लखनौ संघाचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान देखील शेवटचे षटक तणावपुर्ण टाकताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेवट्या षटकात लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका हे मोहसीन आणि संघासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. मोहनीसने देखील या षटकात डेव्हिड आणि ग्रीनला धावा करण्याची संधी दिली नाही.

मोहसीनला हे षटक टाकताना पाहून तसेच संजीव गोयंका यांना प्रार्थना करताना पाहुन अनेकांनी हा यंदाच्या आयपीएलमधला सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले आहे.

मोहसीनने खांद्याच्या दुखापतीतून सावरत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची उंची वाढली असून त्याला भारतीय संघाचे भविष्य मानले जात आहे. मोहसीनने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने, "मी धावपट्टीकडे न पाहता स्व:ताला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी माझी भक्कम बाजू लक्षात ठेवली. मी फलंदाजानुसार चेंडूत बदल करत होतो. माझ्यासाठी दुखापत झाल्यानंतरचा काळ कठीण होता. माझ्या वडिलांना कालच डिस्चार्ज देण्यात आला असून ते आयसीयूमध्ये होते. माझी कामगिरी बघून त्यांना आनंद झाला असेल अशी मला आशा आहे." असे मोहसीनने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in