मुंबई मॅरेथॉन आणि नीरज देशाची शान -केटी मून

२१ जानेवारीला रंगणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा ५९ हजार धावपटू सहभागी होणार आहेत
मुंबई मॅरेथॉन आणि नीरज देशाची शान -केटी मून

मुंबई : ऑलिम्पिक पदकविजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्टपटू तसेच टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर केटी मून गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होती. यावेळी तिने टाटा मुंबई मॅरेथान आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू भारताची शान असल्याने सांगितले. २१ जानेवारीला रंगणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा ५९ हजार धावपटू सहभागी होणार आहेत. “टाटा मुंबई मॅरेथॉन सारख्या सहनशक्तीच्या शर्यतीमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि खेळाडूंना योग्य दिशेने जाण्यास मदत करते,” असे केटी म्हणाली.

logo
marathi.freepressjournal.in