प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट ठरला नंबर एक ; वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये शुभमन गिल अव्वल

भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीच्या जवळपास सर्व रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.
प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट ठरला नंबर एक ; वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये शुभमन गिल अव्वल

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकपमध्ये आपले ८ पैकी ८ सामने जिंकून जागिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा ठेवला आहे. आता भारताचा आयसीसी रँकिंगमध्ये देखील जवळपास सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण झाला आहे.

भारताचा सलामीवीर आणि प्रिंस ऑफ इंडियन क्रिकेट बाबर आझमचं राज्य संपवत वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं. तो आता भारताचा वनडे बॅटिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठणारा सचिन तेंडूलकर, एमएसधोनी आणि विराट कोहलीनंतर चौथा फलंदाज ठरला आहे. याच बरोबर वनडे आयसीसी बॉलिंग रँकिंगमध्ये देखील भारताचा दबदबा आहे. वर्ल्डकपमध्ये भन्नाट गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराजला दोन गुणांचा फायदा झाला आहे. तो आता अव्वल स्थावर पोहचला आहे. मोहम्मद शामीने १० व्या स्थानावर उसळी घेत टॉप टेनमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.

भारतीय संघाने आतापर्यंत आयसीसीच्या जवळपास सर्व रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. भारत वनडे, कसोटी आणि टी २० क्रिकेटमध्ये देखील सांघिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजीत अश्विन अव्वल तर कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये रविंद्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. तर टी २० फलंदाजीत सूर्यकुमार यादव आपलं अव्वल स्थान टिकवून आहे.

भारतीय संघाने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वच क्षेत्रात अव्वल कामगिरी केली आहे. भारताचे सर्व फलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकीपटू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. याच बरोबर भारताने भरीव कामगिरी करत प्रत्येक सामन्यात आपला दबदबा सिद्ध करुन दाखवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in