पृथ्वी शॉचा झंझावात कायम ; आणखी एका विक्रमावर कोरलं नाव

गेल्या महिन्यात जो पृथ्वी शॉ टीकेचा धनी ठरला होता. आता त्यांच्यावर दिग्गज क्रिकेटपटुंकडून कौतूकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
पृथ्वी शॉचा झंझावात कायम ; आणखी एका विक्रमावर कोरलं नाव

भारतीय क्रिकेट संघातील युवा सलामीवीर फलंदात पृथ्वी शॉ गेल्या गेल्या वर्षभरापासून टीमच्या बाहेर आहे. संघात परतण्यासाठी तो इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळतोय. त्याने नॉर्थ्मपटशायरकडून इंग्लंडमध्ये वनडे कपनमध्ये पदार्पण केलं आहे. त्याचा निर्णय गेम चेंजींग ठरला आहे. गेल्या महिन्यात जो पृथ्वी शॉ टीकेचा धनी ठरला होता. आता त्यांच्यावर दिग्गज क्रिकेटपटुंकडून कौतूकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

इंल्लंडमध्ये सुरु असलेल्या वनडे कपमधील पदार्पणसाठी पृथ्वी कमनशिबी ठरला. तो दुर्दैवाने पहिल्याचं सामन्यात हिट विकेट झाला. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. मात्र, यानंतर पृथ्वी शॉने जोरात कमबॅक केलं. पृथ्वीने ९ ऑगस्ट रोजी दणदणीत द्विशतक ठोकलं आहे. यामुळे अख्ख्या क्रिकेट विश्वाचं लक्ष त्याच्याकडे ओढलं गेलं. यानंतर त्याचं सर्वत्र कौतूक सुरु झालं. आता यानंतर चार दिवसांनी त्याने १३ ऑगस्ट रोजी दमदार शतकी खेळी केली.

पृथ्वीने समरसेट विरुद्ध १५३ चेंडूत २८ चौकार आणि ११ षटकार च्या जोरावर २४४ धावांनी दमदार खेळी केली होती. तर डरहम विरुध्द ७६ चेंडूत १५ चौकार आणि ७ षटकारच्या मदतीने नाबाद १२५ धावा ठोकल्या. या दोन सामन्यातू पृथ्वीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचा डोळ्यात झणझणीत अंजन घातलं त्यांच्या टीकेला बॅटने उत्तर दिलं. यासोबत पृथ्वीने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. पृथ्वीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

पृथ्वीने आतापर्यंत एकूण ५७ लिस्ट ए मामन्यामध्ये ५०.०२ च्या सरासरीने आणि ८२.९७ या स्ट्राईक रेटने ३ हजार ५ धावांचा टप्पा गाठला आहे. या धावा करताना पृथ्वीने १ शकतं आणि १६ अर्धशतकं ठोकली आहेत. तर यात ५२१ चौकार आणि ४६ षटकार देखील ठोकले आहेत. पृथ्वीवर सर्व स्थरातून कौतूकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in