डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडुंची आगेकूच

लक्ष्यने इंडोनेशियाच्या अँथनी गिंटीगला २१-१६, २१-१२ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली.
 डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धेत 'या' खेळाडुंची आगेकूच

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, अनुभवी किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत सायना नेहवालचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

लक्ष्यने इंडोनेशियाच्या अँथनी गिंटीगला २१-१६, २१-१२ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. प्रणॉयने चीनच्या झाओ जिनपेंगला २१-१३, २२-२० असे पराभूत केले. उपउपांत्यपूर्व लढतीत प्रणॉय आणि लक्ष्य एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. श्रीकांतने हाँगकाँगच्या अँगुस कालाँगला १७-२१, २१-१४, २१-१२ असे पिछाडीवरून नमवले. श्रीकांतसमोर आता सिंगापूरच्या सातव्या मानांकित लोह कीन यूचे कडवे आव्हान असेल.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत सायनावर भारताची मदार होती. मात्र तिला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या झिंग यिमानने सायनावर २१-१७, १९-२१, २१-११ अशी मात केली. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने मात्र विजयारंभ केला. त्याशिवाय महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंदने आगेकूच केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in