प्रकाश पुराणिक चषक वेंगसरकर फाऊंडेशनने जिंकला; केतकी धुरे स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, तर निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार भारत क्रिकेट क्लबच्या केतकी धुरेने पटकावला तर वेंगसरकर फाऊंडेशनची निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज ठरली
प्रकाश पुराणिक चषक वेंगसरकर फाऊंडेशनने जिंकला; केतकी धुरे स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज, तर निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज

मुंबई : पूनम राऊत आणि श्वेता कलपाथी यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह दुसऱ्या विकेटसाठी केलेली ८२ धावांची भागीदारी आणि रेश्मा नायकने २२ धावांत टिपलेल्या ३ विकेट्स या कामगिरीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने राजावाडी क्रिकेट क्लबचे जेतेपद राखण्याचे स्वप्न १८ धावांनी धुळीस मिळवले आणि प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेवर आपले नाव कोरले.

माहिम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब आणि शिवाजी पार्क जिमखान्याने प्रकाश पुराणिक यांच्या स्मरणार्थ महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेली टी-२० क्रिकेट स्पर्धा संस्मरणीय ठरली. अंतिम सामन्यात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या १५४ धावांचा पाठलाग करताना वृषाली भगतच्या ५६ धावांची झुंजार खेळीने सामन्यात चुरस आणली. रेश्मा नायकने किमया राणे (०) आणि सलोनी कुष्टे (११) यांनी बाद करून सनसनाटी निर्माण केली, पण वृषालीने एकहाती किल्ला लढवताना तुशी शाहबरोबर ३५, शेरल रोझारियोबरोबर ३९ आणि निविया आंब्रेबरोबर ३० धावांची भागी रचत संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. पण तो अपुरा ठरला. ४५ चेंडूंत ५६ धावांची संघर्षपूर्ण खेळी करून वृषाली बाद होताच वेंगसरकरचा विजय निश्चित झाला. राजावाडीला २० षटकांत ९ बाद १३५ धावांपर्यंतच मजल मारता आली. रेश्मा नायकने २२ धावांत ३ तर पूनम राऊतने २२ धावांत २ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी पूनम राऊतने फलंदाजीतही आपली चमक दाखवताना ४४ चेंडूंत ५३ धावा केल्या. तिने श्वेता कलपथीसह दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागी रचली. श्वेतानेही ५३ धावा काढल्या. त्यामुळेच वेंगसरकर फाऊंडेशन १५४ धावांचे लक्ष्य उभारू शकला होता.

क्षमा पाटेकर ठरली सर्वोत्तम खेळाडू

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कार भारत क्रिकेट क्लबच्या केतकी धुरेने पटकावला तर वेंगसरकर फाऊंडेशनची निर्मिती राणे सर्वोत्तम गोलंदाज ठरली. स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राजावाडीच्या क्षमा पाटेकरने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळविला. महिला संघांचे कौतुक करण्यासाठी हिंदुस्थानी संघाचे माजी कसोटीपटू बलविंदरसिंग संधू, अभिषेक नायर आवर्जुन उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in