सिंधूकडून पुन्हा एकदा निराशा; आता सात्विक-चिरागवर आशा, इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने पुन्हा एकदा निराशा केली. इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला, तर सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
(Photo - The Hawk)
(Photo - The Hawk)
Published on

जकार्ता : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने पुन्हा एकदा निराशा केली. इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला, तर सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन हे खेळाडू आधीच पराभूत झाले होते. त्यामुळे महिला एकेरीत सिंधूवर लक्ष होते. मात्र गुरुवारी तिला थायलंडच्या आठव्या मानांकित पोर्नपावी चेंचुआग हिच्याकडून २२-२०, १०-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिला गेम जिंकूनही सिंधूने १ तासाच्या संघर्षानंतर ही लढत गमावली. सिंधूने गेल्या दोन वर्षभरात एकही स्पर्धा जिंकलेली नाही.

दरम्यान, पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सात्विक-चिराग यांच्या जोडीने रास्मस केर व फ्रेडिक सोगार्ड या डेन्मार्कच्या १६व्या मानांकित जोडीला १६-२१, २१-१८, २२-२० असे तीन गेममध्ये पराभूत केले. सात्विक-चिराग यांनी गेल्या आठवड्यात सिंगापूर ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. या स्पर्धेतही फक्त त्यांच्या स्वरूपात भारताचे आव्हान शिल्लक आहे.

logo
marathi.freepressjournal.in