BWF World Tour : पी. व्ही. सिंधू वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीस पात्र

भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने डिसेंबरमध्ये होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
BWF World Tour : पी. व्ही. सिंधू वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीस पात्र
BWF World Tour : पी. व्ही. सिंधू वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीस पात्र
Published on: 

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने डिसेंबरमध्ये होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. वय हा सर्वोत्तम कामगिरी करण्यातील अडथळा नसल्याचे सांगताना सिंधूने ‘३१ हे नवे २१’ असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. चीनमध्ये ९ ते १३ डिसेंबरदरम्यान वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा होईल.

महिला एकेरीतील सुवर्णपिढीतील खेळाडूंमध्ये सिंधूचा समावेश होतो. कॅरोलिना मरिन, नोझोमी ओकुहारा, रॅचनोक इंतानोन आणि ताई झू यिंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत तिने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या वर्ल्ड टूर पात्रता क्रमवारीत सिंधू पाचव्या स्थानावर असून पहिल्या आठ खेळाडूंना या स्पर्धेत प्रवेश मिळणार आहे.

हैदराबादच्या ३१ वर्षीय सिंधूने रविवारी हायलो ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे तिचे यंदाच्या मोसमातील दुसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी तिने जुलैमध्ये जपान ओपन जिंकली होती, तर गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवले होते. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

आपल्या कारकिर्दीतील पूर्वीचे वर्चस्व पुन्हा मिळवू शकते का, या प्रश्नावर सिंधूने ठामपणे सकारात्मक उत्तर दिले. “नक्कीच! का नाही? तुम्ही शरीराची योग्य काळजी घेतली, तर हे शक्य आहे. सध्या अनेक खेळाडू ३०, ३१ आणि ३२व्या वर्षीही सर्वोच्च स्तरावर खेळत आहेत. त्यामुळे पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचण्यात अडचण काय? मी त्या दिशेने वाटचाल करत आहे. मला माहीत आहे की मी अजूनही हे करू शकते,” असे ती म्हणाली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)