जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची तब्बल दोन वर्षांनी अंतिम फेरीत धडक

दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शनिवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची तब्बल दोन वर्षांनी अंतिम फेरीत धडक
जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची तब्बल दोन वर्षांनी अंतिम फेरीत धडक
Published on

टोकियो : दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने शनिवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात टोकियो ऑलिम्पिक विजेती आणि जगातील चौथ्या क्रमांकाची खेळाडू चीनची चेन युफेई हिने दुखापतीमुळे सामन्याच्या मध्यावर माघार घेतली.

भारतीय खेळाडू सिंधू १० अशी आघाडीवर सामन्यात २१-१९, १५-असताना चेन युफेई हिच्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्याने तिला हा सामना सोडावा लागला. सिंधूने दोन वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी २०२४ मध्ये लखनऊ येथे सय्यद मोदी इंटरनॅशनलचे विजेतेपद पटकावल्यानंतर तिची ही पहिलीच फायनल आहे. अंतिम फेरीत पोहोचल्याचा मला खूप आनंद आहे, अशी प्रतिक्रिया सिंधूने सामन्यांनंतर दिली. प्रत्येक सामना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि शीर्ष मानांकित खेळाडूंसोबत खेळताना प्रत्येक गुणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते, असेही सिंधूने नमूद केले. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात सिंधूचा सामना जपानच्या आकानी यामागुची हिच्याशी होणार आहे.

या सामन्यात १२ व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ आणि नेटवरील उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर सामन्यावर नियंत्रण राखले. पहिल्या गेममध्ये सिंधूने ११-७अशी आघाडी घेतली होती, मात्र मध्यंतरानंतर चेन युफेईने जोरदार पुनरागमन केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in