राशिद खान च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह ? काय आहे प्रकरण ?

राशिदला पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवतोय. त्यामुळे त्याला एकदिवशीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय.
राशिद खान च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह ? काय आहे प्रकरण ?

आपल्या मॅचविनर खेळाडूला कोणत्याही प्रकराची दुखापत होऊ नये. यासाठी क्रिकेट बोर्डाकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जाते. नुकतच आयपीएलचा 16 वा हंगाम संपून ज्या त्या देशाचे खेळाडू आपापल्या मायदेशात परतले आहेत. आयपीएल पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मालिकांची रंगत पाहायला मिळणार आहे. 7 जून ते 11 जून या काळात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमध्ये द ओव्हल मैदानात 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप' फायनल रंगणार आहे. दोन्ही संघ या लढतीसाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची एकदिवशीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपापले संघ जाहीर केले आहेत. मात्र, या एकदिवसीय सामन्यांआधी अफगाणिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अकडवून पवेलियनमध्ये पाठवणाऱ्या राशिद खानला दुखापत झाली आहे. राशिदला पाठीच्या खालच्या भागात त्रास जाणवतोय. त्यामुळे त्याला एकदिवशीय मालिकेतून बाहेर पडावं लागलंय.

राशिद खान श्रीलंका विरुद्धच्या तीसऱ्या एकदिवशीय सामन्यात खेळेल अशी आशा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून व्यक्त करण्यात आली असून त्याच्यावर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद नबी, मुजबी उर रहमान आणि नूर अहमद यांच्यावर अतिरिक्त भार असणार आहे. या एकदिवशीय मालिकांना शुक्रवार (2 जून) पासून सुरुवात होणार आहे. तसंच तिन्ही सामने हे एकाच मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

उद्या शुक्रवार 2 जून रोजी पहिला एकदिवशीय सामना सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. रविवार 4 जून रोजी दुसरा सामना सकाळी दहा वाजेला सुरु होणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना हा बुधवार 7 जून रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. ऐनवेळी राशिद खानला दुखापत झाल्याने अफगाणिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे.

logo
marathi.freepressjournal.in