सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा पलटवार; दुसऱ्या स्थानी झेप

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आधीच्या फेरीतील पराभवातून सावरून सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नीदरलँड्सच्या जोर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव केला. या विजयासह १० खेळाडूंच्या या ९ फेऱ्यांच्या स्पर्धेत प्रज्ञानंदने चार डावांनंतर २.५ गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे.
सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा पलटवार; दुसऱ्या स्थानी झेप
सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धा : प्रज्ञानंदचा पलटवार; दुसऱ्या स्थानी झेप
Published on

सेंट लुईस : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आधीच्या फेरीतील पराभवातून सावरून सिंकफिल्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नीदरलँड्सच्या जोर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव केला. या विजयासह १० खेळाडूंच्या या ९ फेऱ्यांच्या स्पर्धेत प्रज्ञानंदने चार डावांनंतर २.५ गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे.

जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरविरुद्ध तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर, या पुनरागमनामुळे फेरीसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतील स्थान मजबूत झाले आहे. चौथ्या फेरीत प्रज्ञानंदचा हा विजय एकमेव निर्णायक सामना ठरला. उर्वरित चारही सिंकफिल्ड चषक सॅम्युएलने बरोबरीत बुद्धिबळ स्पर्धा गोखले, तर सामने बरोबरीत वेस्ली सो ३ गुणांसह आघाडीवर आहे. इतर सामन्यांमध्ये अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला सेव्हियन आणि उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला.

मॅक्सिम वाशिये लाग्राव्हने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरसोबत गुणविभागणी केली. ४,७५,००० डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत अजून पाच फेऱ्या शिल्लक असून प्रज्ञानंद, वाशिये-लाग्राव्ह आणि लेव्हॉन अरोनियन हे आघाडीवरील वेस्ली सो याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत.

दरम्यान, गुरुवारी प्रज्ञानंदला तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ग्रँड चेस टूरचा भाग खेळाडूंमधील लढतीत प्रज्ञानंदने कडवी झुंज दिली, परंतु अखेर त्याला पराभव स्वीकारावा लागला. आता मात्र प्रज्ञानंदने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in