दुखापतग्रस्त शुचीच्या जागी राधा यादवला संधी

आगामी पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त शुची उपाध्यायच्या जागी डावखुरी फिरकीपटू राधा यादवला भारतीय महिला संघात संधी दिली आहे.
दुखापतग्रस्त शुचीच्या जागी राधा यादवला संधी
Published on

मुंबई : आगामी पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त शुची उपाध्यायच्या जागी डावखुरी फिरकीपटू राधा यादवला भारतीय महिला संघात संधी दिली आहे.

गेल्या महिन्यात भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलेली २० ‌वर्षीय फिरकीपटू शुचीच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे शुचीच्या जागी महिला निवड समितीने राधा यादवला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी दिल्याचे बीसीसीआयने सांगितले.

बीसीसीआयच्या बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आयोजित शिबिरात शुचीला दुखापत झाल्याचे समजले. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे शुचीला या दौऱ्याला मुकावे लागले, असे बीसीसीआयने सांगितले.

२८ जून रोजी नॉटिंगहॅममध्ये पहिल्या टी-२० सामन्याने महिला संघाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

दुसरा सामना १ जुलै रोजी ब्रिस्टलमध्ये होईल. तिसरा टी-२० सामना ४ जुलैला ओव्हल येथे, चौथा ९ जुलैला मँचेस्टरमध्ये, आणि पाचवा १२ जुलैला बर्मिंगहममध्ये खेळवला जाईल.

तिन्ही एकदिवसीय सामने अनुक्रमे १६, १९ आणि २२ जुलै रोजी साऊथॅम्प्टन, लॉर्ड्स आणि चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवले जातील.

logo
marathi.freepressjournal.in