रणजी करंडक स्पर्धेसाठी रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व; पृथ्वी शॉ काही लढतींनंतर परतणार

५ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून एकूण ३८ संघ यामध्ये सहभागी होतील.
रणजी करंडक स्पर्धेसाठी रहाणेकडे मुंबईचे नेतृत्व; पृथ्वी शॉ काही लढतींनंतर परतणार
Published on

मुंबई : आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. युवा पृथ्वी शॉ पहिल्या दोन लढतींसाठी अनुपलब्ध असून त्यानंतर तो परतणार असल्याचे समजते.

५ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून एकूण ३८ संघ यामध्ये सहभागी होतील. ३८ संघांची पाच गटांत विभागणी करण्यात आली असून यांपैकी चार एलिट गटांत प्रत्येकी ८ संघ असतील, तर उरलेल्या पाचव्या प्लेट गटात सहा संघांचा समावेश असेल. मुंबईचा ब-गटात समावेश करण्यात आला असून ते ५ जानेवारीपासून बिहारविरुद्ध पहिला साखळी सामना खेळतील. मुंबईच्या गटात बिहार, आंध्र प्रदेश, बंगाल, आसाम, छत्तीसगड, केरळ व उत्तर प्रदेश या अन्य सात संघांचा समावेश आहे.

मुंबईचा संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), जय बिस्ता, भुपेन लालवाणी, हार्दिक तामोरे, सर्फराझ खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, प्रसाद पवार, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर.

logo
marathi.freepressjournal.in