राहुल द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; भारतीय संघाला मोठा दिलासा

भारतीय संघ आशिया चषकासाठी रवाना होण्याच्या दोन दिवसांपूर्वी द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
 राहुल द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; भारतीय संघाला मोठा दिलासा

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर द्रविड दुबईला रवाना झाले. त्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला.

द्रविड यांचाचा कोरोना रिपोर्ट २१ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते बंगळुरूतील त्यांच्या घरी विलगीकरणात होते; मात्र शनिवारी पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

भारतीय संघ आशिया चषकासाठी रवाना होण्याच्या दोन दिवसांपूर्वी द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्षण यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली; मात्र आता द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते दुबईत पोहोचल्याने लक्ष्मण संघाबरोबरच राहणार की परत येणार, याबाबत अनिश्चितता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in