पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया ; म्हणाले, "हे सर्वजण २०१४ पासूनचं..."

ही भेट गुप्त नव्हती. अजित पवार माझा पुतण्यात आहे. पुतण्या वडिलधाऱ्यांना भेटला तर त्यात गैर काय?, शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पवार काका-पुतण्यांच्या भेटीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया ; म्हणाले, "हे सर्वजण २०१४ पासूनचं..."

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील उद्योगपती चोरडीया यांच्या निवास्थानी पार पडलेल्या गुप्त बैठकीने चर्चांना उधान आलं आहे. या भेटीत नेमकं काय खलबत झालं, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. यावर शरद पवार यांनी "ही भेट गुप्त नव्हती. अजित पवार माझा पुतण्यात आहे. पुतण्या वडिलधाऱ्यांना भेटला तर त्यात गैर काय?" असं म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीतील फूट हा शरद पवार यांचाच गेम असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद सांधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "शरद पवार यांनी एक टीम अगोदर पाठवली. दुसरी टीम जाईल हे मी तेव्हाच म्हणालो होतो. त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. हा शरद पवार यांचाचं गेम आहे. आतून हे एकमेकांना मिळाले आहेत. २०१४ पासूनच हे सर्वजण एकमेकांना मिळाले आहेत. फक्त शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा 'चोर'डीया या नावावर मिळाली ही कमाल आहे", असं चिमटा राज ठाकरे यांनी यावेळी काढला.

यावेळी राज यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बोलताना राज म्हणाले की, आताही बैठक ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांसंदर्भात होती. महापालिका निवडणुका होतील असं काही वातावरण दिसत नाही. सध्या राजकीय घोळ झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका घेऊन धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही, असं राज म्हणाले.

राज यांनी युती आणि आघाडीबाबत देखील यावेळी भाष्य केलं. युती आणि आघाडी करायची की नाही या गोष्टी परिस्थितीनुसार ठरतात. सध्या काय सगळीकडे कन्फ्यूजन आहे. कोण कुणाचा आहे तेच कळत नाही. असं म्हणत त्यांनी परवा पनवेल येथे होणाऱ्या मेळाव्यात जे बोलायचं ते बोलेल, असं सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in