परागचे अर्धशतक; राजस्थानची हॅट्‌ट्रिक

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना बोल्ट व लेगस्पिनर युझवेंद्र चहलच्या (११ धावांत ३ बळी) गोलंदाजीपुढे मुंबईची अक्षरशः भंबेरी उडाली. त्यामुळे मुंबईला २० षटकांत जेमतेम ९ बाद १२५ धावाच करता आल्या
परागचे अर्धशतक; राजस्थानची हॅट्‌ट्रिक

मुंबई : ट्रेंट बोल्टने (२२ धावांत ३ बळी) दिलेल्या झटक्यानंतर २२ वर्षीय रियान परागने (३९ चेंडूंत नाबाद ५४) साकारलेल्या आणखी एका झुंजार अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी रात्री मुंबई इंडियन्सला ६ गडी आणि २७ चेंडू राखून सहज धूळ चारली. राजस्थानने विजयाची हॅट्‌ट्रिक साकारून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले, तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला मात्र सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना बोल्ट व लेगस्पिनर युझवेंद्र चहलच्या (११ धावांत ३ बळी) गोलंदाजीपुढे मुंबईची अक्षरशः भंबेरी उडाली. त्यामुळे मुंबईला २० षटकांत जेमतेम ९ बाद १२५ धावाच करता आल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल (१०), जोस बटलर (१३), कर्णधार संजू सॅमसन (१२) स्वस्तात बाद झाल्यावर परागने चौथ्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विनसह ४० धावांची भागीदारी रचली. अश्विन बाद झाल्यावरही परागने किल्ला लढवून ५ चौकार व ३ षटकारांसह हंगामातील दुसरे अर्धशतक साकारले. त्यामुळे राजस्थानने १५.३ षटकांतच विजय साकारला. बोल्ट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर परागकडे सध्या ऑरेंज कॅप आहे.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने -जय - पराजय -गुण - धावगती

  • राजस्थान - ३ - ३ - ० - ६ - १.२४९

  • कोलकाता - २ - २ - ० - ४ - १.०४७

  • चेन्नई - ३ - २ - १ - ४ - ०.९७६

  • गुजरात - ३ - २ - १ - ४ - -०.७३८

  • हैदराबाद - ३ - १- २ - २ - ०.२०४

  • लखनऊ - २ - १ - १ - २ - ०.०२५

  • दिल्ली - ३ - १ - २ - २ -०.०१६

  • पंजाब - ३ - १ - २ - २ -०.३३७

  • बंगळुरू - ३ - १ - २ - २ - ०.७११

  • मुंबई - ३ - ० - ३ - ० -१.४२३

(मुंबई वि. राजस्थान सामन्यापर्यंत)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in