आयपीएलच्या ६७ व्या सामन्यात लय टिकवून ठेवण्याकडे राजस्थानचा कटाक्ष असणार

 आयपीएलच्या ६७ व्या सामन्यात लय टिकवून ठेवण्याकडे राजस्थानचा कटाक्ष असणार

आयपीएलच्या ६७ व्या सामन्यात गुरुवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुकाबला होत आहे. या सामन्यात लय टिकवून ठेवण्याकडे राजस्थानचा कटाक्ष असणार आहे. बंगळुरूला मात्र पहिल्या चार क्रमांकावर पहोचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणर असून अन्य संघांच्या निकालांकडे डोळे लावून बसावे लागणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांपैकी १० सामन्यांत विजय मिळविला आहे. २० गुणासह गुजरातने याआधीच प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सात सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. १३ सामन्यांत १४ गुणांसह हा संघ पाचव्या स्थानावर आहे. बंगळुरूचा नेट रनरेट मायनस ०.३२३ आहे. गुजरातवर विजय मिळविल्यास गुजरातचे १६ गुण होतील. परंतु इतर संघांचा अनुकूल निकाल लागण्याची वाट पाहत त्यांना बसावे लागेल.

दिल्ली कॅपिटल्स चौ‌थ्या स्थानावर असून शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला नमवून ते १६ गुण मिळवू शकतात. त्यांचा रनरेट बंगळुरूपेक्षा चांगला म्हणजे प्लस ०.२५५ इतका आहे. त्यामुळे बंगळुरूला आता मोठ्या फरकाने विजय मिळविण्याशिवाय गत्यंतर नाही.

बंगळुरूला कर्णधार फॅफ डु प्लेसिस, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांना चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

गोलंदाजीत में हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा यांंनी चमम दाखविली आहे. गेल्या सामन्यात पंजाबचे फलंदाज अन्य गोलंदाजांच्या गोलंदाजीची जोरदार पिटाई करीत असतानाच या दोघांनी प्रभावी गालंदाजी करत अनुक्रमे चार आणि दोन विकेट‌्स मिळविले होते. जोश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज यांना धावा रोखून धरण्याचे प्रयत्न करावे लागतील. गुजरातला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संध मिळणार आहेत. या सामन्यात त्याचा पराभव झाला, तरी त्यांचे सर्वोच्च स्थान अबाधित राहील. गुजरातचे फलंदाज वृद्धिमान साहा, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, कर्णधार हार्दिक पंड्या आणि राहुल तेवतिया यांना सातत्य टिकवावे लागेल. मोहम्मद शमी, यश दयाल , लॉकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसफ यांना प्रभावी गोलंदाजीची लय कायम ठेवण्यावर गभर द्यावा लागेल. फिरकी गोलंदाजीची धुरा अथार्तच राशिद खानवर राहील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in