रोहतकऐवजी आता कोलकातामध्ये होणार मुंबई-हरयाणा लढत; रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई-हरयाणा उपांत्यपूर्व लढत रोहतकऐवजी कोलकाता येथे खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
रोहतकऐवजी आता कोलकातामध्ये होणार मुंबई-हरयाणा लढत; रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
Published on

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मुंबई-हरयाणा उपांत्यपूर्व लढत रोहतकऐवजी कोलकाता येथे खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी याविषयी माहिती दिली.

८ फेब्रुवारीपासून रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीला प्रारंभ होणार असून मुंबई-हरयाणा यांच्यातील सामना बन्सीलाल स्टेडियम, लाहली येथे होणे अपेक्षित होते. मात्र तेथील हवामानामुळे ही लढत कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होईल, असे समजते. हरयाणाने मात्र याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही संघ बुधवारी सायंकाळी कोलकातासाठी रवाना झाले. रणजी स्पर्धेत गटात अग्रस्थान मिळवणाऱ्या संघांच्या राज्यात उपांत्यपूर्व लढत खेळवली जाते. मात्र आता हरयाणाला घरच्या मैदानात खेळण्याचा लाभ मिळणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in