रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा :तन्मयचे विक्रमी वेगवान त्रिशतक

तन्मयने ३४ चौकार व २६ षटकार लगावले. हैदराबादने हा सामना एक डाव आणि १८७ धावांच्या फरकाने जिंकला
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा :तन्मयचे विक्रमी वेगवान त्रिशतक

हैदराबादच्या तन्मय अगरवालने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत १८१ चेंडूंत तब्बल ३६० धावा फटकावल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले. १४७व्या चेंडूवर तन्मयने त्रिशतक साकारले. तसेच रणजीतील एका डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला. त्यामुळे हैदराबादने ५९.३ षटकांत तब्बल ४ बाद ६१५ धावांवर डाव घोषित केला. तन्मयने ३४ चौकार व २६ षटकार लगावले. हैदराबादने हा सामना एक डाव आणि १८७ धावांच्या फरकाने जिंकला. अरुणाचलचा पहिला डाव १७२, तर दुसरा डाव २५६ धावांत आटोपला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in