रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रेल्वेविरुद्धच्या लढतीसाठी शार्दूल ठाकूर अनुपलब्ध; मुंबईचा संघ कायम

रणजी करंडक स्पर्धेतील रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने आपला १६ सदस्यीय संघ कायम ठेवला आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे या सामन्यासाठीही उपलब्ध नसेल. मुंबई आणि रेल्वे यांच्यातील एलिट गट 'ड'मधील चौथ्या फेरीचा सामना २ नोव्हेंबरपासून येथे खेळवण्यात येणार आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रेल्वेविरुद्धच्या लढतीसाठी शार्दूल ठाकूर अनुपलब्ध; मुंबईचा संघ कायम
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : रेल्वेविरुद्धच्या लढतीसाठी शार्दूल ठाकूर अनुपलब्ध; मुंबईचा संघ कायमX
Published on: 

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने आपला १६ सदस्यीय संघ कायम ठेवला आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूर दुखापतीमुळे या सामन्यासाठीही उपलब्ध नसेल. मुंबई आणि रेल्वे यांच्यातील एलिट गट 'ड'मधील चौथ्या फेरीचा सामना २ नोव्हेंबरपासून येथे खेळवण्यात येणार आहे.

या हंगामात रेल्वेचे घरच्या मैदानावरील सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होत असल्याने या सामन्यात मुंबईचा संघ पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. मुंबईचा माजी कर्णधार शार्दूल ठाकूर गोलंदाजी करत असताना आयुष म्हात्रेने मारलेला चेंडू त्याच्या हाताला लागला होता. या दुखापतीमुळे त्याला रणजी करंडक स्पर्धेच्या किमान पहिल्या चार फेऱ्यांना मुकावे लागणार आहे.

४२ वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईने या हंगामाची दमदार सुरुवात केली आहे. सलग तीन सामन्यांत बोनस गुणांसह विजय मिळवत मुंबईचा संघ गट 'ड'मध्ये अव्वल स्थानावर आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने चंदीगडचा एक डाव आणि १५५ धावांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात हिमाचल प्रदेशवर एक डाव आणि ९७ धावांनी मात केली. तिसऱ्या फेरीत हरियाणाचा १० गडी राखून धुव्वा उडवला.

मुंबईचा संघ : सिद्धेश लाड (कर्णधार), आकाश आनंद, अंगरिक्ष रघुवंशी, सूर्यांश शेडगे, दिव्यांश सक्सेना, मुशीर खान, सर्फराज खान, सुवेद पारकर, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसोझा, ओंकार तरमाळे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)