पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजताच आम्ही सामना गमावला; तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींचे रोखठोक विधान

जेव्हा मी खेळपट्टी पाहिली, तेव्हाच येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल, हे स्पष्ट झाले. याविषयी मी संघाच्या बैठकीतही मत मांडले. मात्र...
पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजताच आम्ही सामना गमावला; तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णींचे रोखठोक विधान

ऋषिकेश बामणे/मुंबई

आम्ही मुंबईविरुद्धचा उपांत्य सामना शनिवारी म्हणजेच पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजताच हरलो, असे रोखठोक विधान तामिळनाडूचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘ग्रीन टॉप’ म्हणजेच खेळपट्टीवर पुरेसे गवत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे कुलकर्णी म्हणाले.

“जेव्हा मी खेळपट्टी पाहिली, तेव्हाच येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे योग्य ठरेल, हे स्पष्ट झाले. याविषयी मी संघाच्या बैठकीतही मत मांडले. मात्र शेवटी अंतिम निर्णय कर्णधाराचा असतो. आम्ही प्रथम गोलंदाजी करणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी कर्णधाराला प्रथम फलंदाजी करणे योग्य वाटले असावे. आम्ही लढतीच्या पहिल्या सत्रातच ५ फलंदाज गमावले. तिकडेच आम्ही सामना गमावला होता,” असे कुलकर्णी यांनी सांगितले.

कर्णधार किशोरच्या वैयक्तिक कामगिरीचे मात्र त्यांनी कौतुक केले. तसेच उपांत्यपूर्व सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक साकारले होते. कधी-कधी अचानक घेतलेले निर्णय तुमच्या संघासाठी फलदायी ठरतात, मात्र कधी त्यांचा फटकाही बसू शकतो, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in